HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 600 कोटींची काळी माया

औरंगाबाद- आर्थिकदृष्ट्या मागास प्रदेश म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. याच ओळखीच्या जोरावर दरवर्षी मराठवाड्यातील जनता सरकारी दरबारी आपले दुखणे मांडत असते. परंतु मराठवाड्याची दुसरी बाजू संपन्न असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाई सुमारे सहाशे कोटी रुपयांची काळी माया मराठवाड्यातून जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

औरंगाबाद आयकर विभागाने काळ्या पैशाचा शोध घेत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतून सहाशे कोटींची माया जप्त केली आहे. यापैकी एकट्या जालना शहरातून सुमारे ३०० कोटी तर औरंगाबाद शहरातून १२० कोटी रुपयांचे काळे धन सरकारजमा झाले. सप्टेंबर २०१६ ते मे २०१७ या कालावधीतील शोधमोहिमेतून हे काळे धन समोर आले आहे. जून आणि जुलैची गोळाबेरीज अजून बाकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा उपक्रम! – मुख्यमंत्री

Aprna

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील” फडणवीसांचा टोला

News Desk

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय – संजय राऊत

News Desk