HW News Marathi
Covid-19

अखेर सत्य पुढे आलेच ! मुंबईत ८६२, तर अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू जाहीर !

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्य वेगाने वाढत आहे. मात्र, ICMRच्या दिशानिर्देशांचे पालन न करता राज्यातील कोरोनाच्या मृतांचा खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप काल (१५ जून) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले होते. यानंतर प्रशासनाने आज (१६ जून) मुंबईतील ८६२ आणि राज्यातील ४६६ कोरोना मृतांचे आकडे नव्याने जाहीर करण्यात आले. असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे. राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीसने ट्वीटमध्ये म्हटले, “अखेर सत्य पुढे आलेच…! मुंबईत ८६२ आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले. असे एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील.” फडणवीस यांनी काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, “मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले ? ‬‪इतके अक्षम्य दुर्लक्ष का ?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांकडून विचारण्यात आला आहे.”मुंबईत सुमारे ९५० अधिकचे मृत्यू हे कोरोनामुळे झालेले आहेत. मात्र, त्या मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोनास्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जनसामान्यांना द्यावी आणि हा गैरप्रकार केलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी”, असे मागणी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या पत्रात केली आहे.

संंबंधित बातम्या

मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले ?, फडणवीसांचा सवाल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून सोमवारी राज्यव्यापी ‘वीजबिल होळी’ आंदोलन

News Desk

राज्यात काल ७८२७ नवे रुग्ण आढळले, तर ३३४० जण झाले कोरोनामुक्त

News Desk

देशात कोरोनाची दूसरी लाट ओसरल्याचे चिन्ह, नव्या रुग्णांमध्ये झाली घट

News Desk