HW News Marathi
महाराष्ट्र

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किन्नौर येथील बटसेरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर गखमी झालेत, या दुर्घटेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस आणि स्थानिक प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. बटसेरी येथे असेलेला पूल दरड कोसळल्याने पूर्णपणे तुटून जमिनदोस्त झाला आहे.

९ जणांचा मृत्यू झालाय

डोंगरालगत उभ्या असेलल्या वाहनांचे देखील यात मोठे नुकसान झाले आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस किन्नौरी बटसेरा गावातील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड कोसळून मृत्यू झालेले ९ लोक हे पर्यटक असून ते छत्तीसगड येथील होती अशी माहिती समोर येतेय. एकूण १२ प्रवासी होते त्यातील ९ जणांचा मृत्यू झालाय. ३ जखमींमध्ये बटसेरा येथील काही नागरिक आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सरकारच्या बदनामीचे कटकारस्थान,” नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप तर दरेकरांचं उत्तर!

News Desk

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

swarit

शिवसेनेकडून स्वप्नील लोंकरच्या परिवाराला १० लाखांची मदत, बहिणीच्या शिक्षणासाठीही मदत- एकनाथ शिंदे

News Desk