HW News Marathi
Covid-19

ठरलं ! उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे ९ आमदार ‘या’ दिवशी घेणार आमदारकीची शपथ

मुंबई । राज्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापल्या संख्याबळानुसारच उमेदवार दिल्याने राज्याची विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. त्यानंतर आता राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचाही मुहूर्त ठरला आहे. १८ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे एकूण ९ उमेदवार आपल्या आमदारकीची शपथ घेणार आहेत. विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थिती हे सर्व ९वउमेदवार आमदारकीची शपथ घेतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत उद्धव ठाकरे आता आमदारकीची शपथ घेणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या निवणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोधच व्हावी यासाठी महाविकासआघाडी प्रयत्नशील होती. महाविकासआघाडीच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

राज्याच्या विधान परिषदेचे उमेदवार

शिवसेना

  • उद्धव ठाकरे
  • नीलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस

  • शशिकांत शिंदे
  • अमोल मिटकरी

काँग्रेस

  • राजेश राठोड

भाजप

  • रणजितसिंह मोहिते पाटील
  • गोपीचंद पडळकर
  • प्रवीण दटके
  • रमेश कराड

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे संकट पाहता विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरू होणार

News Desk

औरंगाबादजवळ मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

News Desk

राज्यात आज ३३०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर १३१५ जणांना डिस्चार्ज

News Desk