HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री सहायता निधीत ९३ कोटी जमा, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व् संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या ३ दिवसांत ९३ कोटी ५ लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वांचेच आभार मानले आहेत. आज (३१ मार्च) प्रामुख्याने शिर्डी संस्थानाने ५१ कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी ११ कोटी रुपये, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने १ कोटी रुपये दिले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

‘कोविड 19’ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. “उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19″ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे” आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

Related posts

आता वेळ सिमोल्लंघनाची, तयारी करा !

News Desk

‘त्या’ व्हिडीओवर महाराष्ट्र भाजपने दिले स्पष्टीकरण

अपर्णा गोतपागर

इन्स्टाग्राम फीचर्स बदलणार

News Desk