पुणे | पुण्यात कोरोनामुळे ६० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा कोरोनाची लागण झाली होती. यानंतर महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यामुळे गेल्या २४ तासात पुण्यात करोनामुळे आणखी दोन बळी गेले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यापूर्वी काल (४ एप्रिल) रात्री ‘कोरोना’ग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ ‘कोरोना’बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४ जणाचा मृत्यू झाला आहे.
A 60-year-old woman, who was brought dead at Pune's Sassoon Hospital on April 3, has been found #COVID19 positive. She had earlier tested negative: Sassoon Hospital officials in Maharashtra
— ANI (@ANI) April 5, 2020
या ६० वर्षीय महिलेवर गेल्या तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर ६० वर्षीय महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ही आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी गेल्यानंतर महिलेची तब्यात बिघडली, त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या महिलेने परदेशात प्रवास केलेला नाही.
या महिलेच्या मृत्यूनंतर तिचा ‘स्वाब’ घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो पॉसिटिव्ह आला आहे. त्यामुळे या मधल्या काळात तिचा कोणाकोणाशी संपर्क आला याची माहिती घेतली जात आहे. पुण्यात काल रात्री उशिरा एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट रात्री उशिरा आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले, असे सूत्रांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.