HW News Marathi
महाराष्ट्र

‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल

मुंबई | महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल झाला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (PCPNDT) कायद्याअंतर्गत इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीची नोटीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना १७ फेब्रुवारीला बजावली होती.

यानंतर गवांदे यांनी २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयामार्फत नोटीस दिली. न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर अखेर १९ जून रोजी इंदुरीकरांविरोधात संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगमनेरच्या न्यायालयात पीसी पीएनडीटी कायद्यानुसार निवृत्ती महाराज देशमुखांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.

महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत!”, देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर निशाणा

News Desk

ठाण्यातील गिरीजा हाईट्स इमारतीला आग

swarit

एवढा नामोहरम, जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष पाहिला नाही !

News Desk