मुंबई | वाधवान कुटुंबितील कपिल आणि धीरज वाधवान यांना सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे. सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईला पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. अटकेची प्रक्रिया सुरू आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. सातारा पोलिसांनी वाधवान बंधुना कोरोनासंदर्भातील काळजी म्हणून आवश्यक ती साधनसामुग्री दिली आहे. त्यासोबत १+३ गार्ड अशी पोलीस यंत्रणा त्यांच्यासोबत असून मुंबईत पाठविण्यात आले आहे. त्यासोबत, लिखित स्वरुपात पत्रही देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
A #CBI team has taken both Kapil and Dhiraj Wadhwan into custody.@SataraPolice has given them all required assistance & an escort vehicle with 1+3 guard upto Mumbai on a written request.
The arrest procedures are going on.#LawEqualForAll— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 26, 2020
वाधवान कुटुंबियांनी राज्यातील लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली करत मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. वाधवान कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि. कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. वाधवान कुटुंबियांचा २२ एप्रिलला क्वारंटाईन संपला असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली होती.
वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल
वाधवान कुटुंबाने लॉकडाऊनचे सर्व नियम मोडत प्रवास केला होता. दरम्यान, त्यांना या प्रवासाची परवानगी गृह मंत्रालयातील विशेष सचिव अमिताभ गुप्ता याांनी दिली होती. याच वाधवान कुटुंबीतील कपिल वाधवान आणि २२ जणांवर साताऱ्यातील महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कलम १८८, २९६, २७०, ३४ यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.