HW News Marathi
Covid-19

काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचा पुढाकार ! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटींची मदत

मुंबई | राज्यातील गंभीर कोरोनास्थितीत काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे १ कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एका महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

“महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींपाठोपाठ २ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही घेतली कोरोना लस

News Desk

कोरोना हॉटस्पॉट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू ॲपचा प्रभावी वापर आवश्यक !

News Desk

देहविक्रयातील महिलांसाठी यशोमती ठाकूर यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

News Desk