मुंबई | “शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळविण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाला आहे”, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णयावर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्णयानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर आरोपाच्या फैरी सुरूच आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (18 फेब्रुवारी) कारमधून मातोश्री बाहेरील कार्यकर्त्यांना संबोधित केले. या पार्श्वभूमीव संजय राऊत यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणसाठी पैसे घेऊन हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याचा गंभीर आरोप आज (19 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी अत्यंत खात्रीने बोलतोय की, तुम्ही म्हणाल पुरावे काय आहे. तर ते लवकरच येतील. जो पक्ष आणि जो नेता शाखा प्रमुख आणि नगरसेवकांना खरेदी करण्यासाठी 50-50 लाख रुपये. तर आमदारांना खरेदी करण्यासाठी 50 कोटी रुपये देतो. आणि खासदारांना खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपये देते आहे. तो पक्ष शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करुन बसला असेल. याचा हिशेब तुम्हाला जमणार नाही. यासाठी 100 ऑडीटर लावावे लागतील. आणि माझ्याकडे पक्की माहिती आहे. माझ्यासह अनेकांकडे माहिती आहे. आतापर्यंत चिन्ह शिवसेना हे नाव विकत घेतले गेले आहे. हा न्याय नाही, हा निर्णय विकत घेतलेला आहे. हा सौदा आहे. ही डिल आहे. आणि आतापर्यंत 2 हजार कोटी रुपये यावर खर्चे झालेले आहेत. पुढचे मी तुम्हाला भविष्यात सांगेन. पण आता मी माझ्या मतावर ठाम आहे. हा निर्णय विकत घेतलेला निर्णय आहे. कारण हे सरकार खोक्यातून निर्माण झालेले आहे. आमदार खासदार विकत घेऊन निर्माण झालेले आहे. आजही नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरविले गेले आहेत. त्यांनी चिन्ह आणि नाव हे विकत घेण्यासाठी किमान 2 हजार कोटी रुपये खर्च केल्याची माहिती त्यांच्याच पैकी त्यांच्या मत्री परिवारांतील बिर्ल्डरांनी माझ्याकडे दिलेली आहे. ते बिर्ल्डर कुठे बसलेले आहे हे तुम्हालाही माहिती आहेत. आणि सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे अत्यंत खात्रीपुर्वक सांगतोय. आतापर्यंत 2 हजार कोटी रुपये उडालेले आहेत. चिन्ह आणि नाव यासाठी परत सांगतोतय. हा निकाल विकत घेतलेला आहे. यापुढे अशा अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे. दिल्लीचे लोक एक दिवस हे मुंबई आणि महाराष्ट्र विकत घेतील. 2 हजार कोटी ही रक्कम लहान नाहीये. फक्त एका चिन्हासाठी, चार अक्षरांसाठी शिवसेना.”
शिव जयंतीसंदर्भात संजय राऊत म्हणाले, “शिव जयंतीनेहमी उत्साहत साजरी होती. लोकमान्य टिळकांनी शिवजी महाराजांची जयंती ही स्वातंत्र्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी असंतोषाला वाचा फोडण्यासाठी शिवजयंती साजरी करायला लोकांना प्रवृत्त केले. आणि त्यानंतर महाराष्ट्रमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रांच्या शत्रूंच्या विरोधात मराठी माणसाची एकजूट दाखविण्यासाठी शाखा शाखातून गावा गावातून जयंती उत्सव साजरे करण्याच्या सूचना दिल्या. आणि आजही शिवजयंती आता सर्व स्तरामध्ये सर्व जाती धर्मामध्ये पसरली जाते. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्र आणि देशाचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवरायांचे नेहमीच स्वराजांच्या शत्रू विरोधात आणि गद्दारांविरोधात आपली तलवार ही उपसली. आणि त्यांच्यावरती हल्ले केले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये तोच विचार बैईमान आणि गद्दारांविरोधात लढण्याचा विचार कायम आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.