HW News Marathi
Covid-19

आता कोरोना वॉरियर्संना कामसाठी पाच दिवसांचा आठवडा

मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिवस-रात्री कर्तृव्य बजावणाऱ्या वॉरियर्स आता कामसाठी पाच दिवसांचा आठवडा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आताकोरोना वॉरियर्स यांना दोन दिवस आराप करता येईल. यात महत्वाचे म्हणजे कोरोना वॉरियर्स यांच्या निवासाची सोय ही रुग्णालया जवळच करण्यात येणार आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांची दिवस-रात्र काम करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचार्‍यांना पाच दिवस काम व दोन दिवस सुट्टी घेण्याची मुभा पालिकेकडून देण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रशासकीय काम करणार्‍या किंवा सुपरविजन करणार्‍या वरिष्ठ डॉक्टरांना ही सुविधा लागू राहणार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टर आणि नर्स यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि अडचणींसदर्भात केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत पालिका कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली.

रुग्णालयाच्या जवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय

डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था हॉस्पिटलपासून जवळच करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि मुंबई बाहेरून येणार्‍या सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, रिकाम्या वार्डमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…त्यानंतरच आम्ही १०० युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ ! ऊर्जामंत्र्यांचा निशाणा 

News Desk

पुण्यातील व्यापारी महासंघातर्फे लॉकडाऊनला विरोध, अनलॉक करण्याची प्रशासनाकडे मागणी

News Desk

कोरोना वॉरियर्ससाठी पीपीई किट तयार करणारा भारत बनला दुसरा देश

News Desk