HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले

पणजी | भारतीय नौदलांचे मिग २९ के हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची घटना आज (१६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले असून ते सुरक्षित आहे. दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ हा अपघात घडली असून गोव्यातील ‘आयएनएस हंसा’ हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले होते.

वेर्णा येथे औद्योगिक वसाहत असून या परिसरात अनेक कंपन्या आणि कारखाने आहेत. मात्र, विमान निर्मनुष्य ठिकाणी कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली. विमान कोसळल्याचे दिसताच लोकांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रशासनाने लागलीच अग्निशामक दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटना स्थळावर पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी त्यांची नावे आहेत.

पॅराशूटमधून उतरलेल्या दोन्ही पायलटला स्थानिकांनी मदत करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. नौदलाचे विमान नेमके कोणत्या कारणास्तव कोसळले याची चौकशी संबंधित यंत्रणोकडून केली जाईल. विमान कोसळल्यानंतर लोकांना धुराचे प्रचंड मोठे लोट परिसरात पसरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : पुण्यातील शाळा बंद, शक्य असेल तर कर्मचाऱ्यांनी घरातून काम करा !

swarit

नवाब मलिकांचं नवं ट्विट, ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ तर वानखेडेंचं स्पष्टीकरण

News Desk

फडणवीसांची उंची मोदी आणि सह्याद्रीपेक्षा जास्त म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत,राऊतांची टोलेबाजी

News Desk