HW News Marathi
महाराष्ट्र

टिपू सुलतानच्या नामकरणावरून भाजप अन् बजरंग दलाचे मुंबईत तीव्र आंदोलन

मुंबई | मालाड येथील मालवणीमधील एका उद्यानाला ‘वीर टिपू सुलतान उद्यान’ यांचे नाव देण्यात आले आहे. मालाडमध्ये उद्यानाबाहेर भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. यावरून आता वाद विकोपाला गेला आहे. भाजप आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी केली आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्यानाचे नावकरण करून मतपेटी सुरक्षित प्रयत्न करत आहे,अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी महाविकासआघाडीवर केली आहे.

काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून मालाड येथील मालवणीमध्ये या उद्यानाला नाव दिले आहे. “विकास कामे बघा नावमध्ये अडकू नका?, असा टोला अस्लम शेख यांनी विरोधकांना केला आहे. यावरून विधानसेभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शिवसेनेवर टीका केली आहे. टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान देशगौरव होऊच शकत नाही. टिपू सुलतानाचे नाव उद्यानाला देणे अयोग्य ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

भाजपनेच टिपू सुलतानचे नाव रस्त्यांना दिले आहे. नावावरून भाजपचे राजकारण सुरू आहे. विकास कामे बघा आणि नावामध्ये अडकू नका?,  असा टोला आरोप शेख यांनी विरोधकांना लगावला आहे. शेख पुढे म्हणाले, सामान्य खेळाडूंना उद्यान उपलब्ध व्हावे हा हेतू आहे.टिपू सुलतान यांनी हिंदूंवर अत्याचार केले होते. टिपू सुलतानने हिंदूंचे अनेक मंदिरे उध्वस्त केले असून हजारो हिंदूंचे धर्मांतरण करून त्यांची हत्या केली. यामुळे टिपू सुलतानचे नाव दिल्यामुळे विरोध होत आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंगरी इमारत दुर्घटना | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही दुर्घटना घडली !

News Desk

माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला !

News Desk

शरद पवारांच्या तोंडातील अल्सर काढला, तब्येत एकदम ठणठणीत – नवाब मलिक

News Desk