HW News Marathi
महाराष्ट्र

आयुक्त संजय पांडे यांचा हस्ते पात्र सहायक पोलीस उप निरीक्षकांना पदोन्नती

मुंबई | मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभाग कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या आणि एकूण ३० वर्षे सेवा तसेच तीन वर्षे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक(ASI) पदावर सेवा पूर्ण झालेल्या ४३ पोलीस जवानांना आयुक्त संजय पांडे यांच्याद्वारे पोलीस उप निरीक्षक(PSI) ही पदोन्नती देण्यात आली.

२५ फेब्रुवारी रोजीचे शासन निर्णयातील तरतूदी प्रमाणे ३० वर्ष सेवा पूर्ण झालेले, सहायक पोलीस उप निरीक्षक(ASI) या पदावर ३ वर्षापूर्वी पदोन्नती मिळालेली व पोलीस उप निरीक्षक(PSI) पदाची वेतनश्रेणी घेत असलेले पोलीस अंमलदार यांना पोलीस उप निरीक्षक (PSI) म्हणून संबोधण्यात यावे अशी तरतूद होती.

त्या तरतूदीच्या आधारावर गुरुवारी १७ मार्चला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नागपाड्याच्या दक्षिण प्रादेशिक विभागातील (South Region Office) ४३ पात्र सहायक पोलीस उप निरीक्षक(ASI) यांना पोलीस उप निरीक्षक (PSI) पदी पदोन्नती दिली गेली. उर्वरीत ४ प्रादेशिक विभागातील अंमलदारांना लवकरच पोलीस उप निरीक्षक (PSI) पदाची पदोन्नती देण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी या संबंधीचे फोटो व माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल द्वारे प्रसिद्ध केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देवेंद्र फडणवीस दिल्लीचे ब्ल्यू बॉय आय!”

News Desk

सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेते पदी निवड

swarit

सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराष्ट्रातही तसंच होईल – संजय राऊत

News Desk