HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘त्रिसूत्री’ कार्यक्रम

पुणे | राज्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यातील मुंबईनंतर पुण्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (१८ एप्रिल) पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यासाठी पुण्यातील मृत्यूजर कमी करण्यााठी एक त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, लवकर निदान करणे, लक्षणे नसणाऱ्यांवर उपचार आणि अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे, अशी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे.

‘ससून रुग्णालयातील अतितक्षता विभागात रुग्णसेवेचा दर्जा आता आणखी उंचावण्यात आला आहे. तसंच अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधारे आगामी काळात आपण हा मृत्यूदर कमी करू शकतो,’ असा विश्वास कोरोनाविरोधातील लढाईतील सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत वृत्तपत्राला दिलेल्या माहिती म्हणाले. सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी ही त्रिसूत्री तयार केली आहे. कोरोनसंदर्भात झालेल्या बैठकीत ही त्रिसूत्री ठरवण्यात आली. या त्रिसूत्रीच्या आधारे पुण्यातील मृत्यूदर कमी करण्याचे नियोजन आहे.

पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून द्यावी, शरद पवारांची मागणी

News Desk

‘हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा’, नाना पटोलेंची टिका!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी

Aprna