HW News Marathi
महाराष्ट्र

दिवसाढवळ्या भररस्त्यात खून झाल्याने बीड शहरात खळबळ

बीड | बीड मध्ये पुन्हा एकदा गुंडाराजाचे चित्र पाहायला मिळाले आहे. बीड शहरातील बस स्थानकालगत मुख्य महामार्गावर भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आलीय. ही घटना काही वेळापूर्वी बीड शहरात घडलीय. शेख शाहिद शेख सत्तार वय २४ तरुग्णाचे नाव असून राहणारा खासबाग बीड राहणारा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शेख शाहिद हा बसस्टँड परिसरात असताना अचानक आलेल्या ३ ते ४ जणांनी धारधार श्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेखच्या पोटावर आणि छातीवर वार केले. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेखचा खून का केला ? हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुंडा राजाच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यात खाकीचा धाक संपलाय का ? असाच प्रश्न स्थानिकाच्या मनात येत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू कोयत्याने पुसणारी आमची अवलाद नाही | पंकजा मुंडे

News Desk

आधी शिवरायांचा अपमान,आता श्रीपाद छिंदमचा नवा कारनामा!

News Desk

“…ही त्यांची खंत आहे, म्हणून त्यांना गरळ ओकायची सवय लागलीये”, अजित पवारांचा आशिष शेलारांवर निशाणा!

News Desk