HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री निधी देताना कोणतीच काटकसर करत नाहीत, अब्दुल सत्तारांचा चव्हाणांना पलटवार

रत्नागिरी | “काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही,” असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. यावरुन पुन्हा एकदा महाविकासआघाडीत वाद निर्माण होण्याच्या चिन्हे दिसली. असे असतानाच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर पडदा टाकला आहे. “मुख्यमंत्री निधी देताना कुठलीच काटकसर करत नाहीत,” असे प्रत्युत्तर सत्तार यांनी या प्रश्नावर दिले आहे.

महाविकासआघाडी पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या खात्यासहित त्यांच्या मतदार संघापर्यत निधी दिला जातो. तिन्ही नेत्यांच्या लोकप्रतिनिधींचा सन्मान मुख्यमंत्री नेहमी करतात. मुख्यमंत्री निधी देताना ते कुठलीच काटकसर करत नाहीत, अशा शब्दात सत्तार यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. कुठे तरी एक्का दुक्का चुकला असेल. महाविकासआघाडीचं पहिलं सरकार की जिथे मंत्र्यांना इतके अधिकार देण्यात आले आहे. मुख्यमंत्री इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत आहेत, असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारकी मिळवणारे मातब्बर नेते भारत भालके!

News Desk

कंगनाला मिळालेलं राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या – संजय राऊत

News Desk

विखे पाटील-बाळासाहेब थोरात एकमेकांवर टीका, नंतर एकाच सोफ्यावर बसून गप्पा

News Desk