HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांची धडक होऊन भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक विचित्र अपघात झाला. या अपघातात तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. टेम्पो, ट्रेलर, कार सह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.

पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातातील दोन जखमीनां अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृतांना खोपोली रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

कसा घडला अपघात?

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे.

या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना, नुकसानीची करणार पाहणी

News Desk

‘उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा’ निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोप !

News Desk

मोदींनी बाहेर बसवून ठेवल्याने अजित पवारांची मानसिकता बिघडलीय !

News Desk