HW News Marathi
महाराष्ट्र

एप्रिल फूल दिनी ‘कोरोना’संदर्भात मेसेज व्हायरल कराल,तर पोलीस गुन्हा दाखल करणार

पुणे | कोरोना संसर्ग देशभरात वेगाने वाढ आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकराने देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक कोरोना विषाणू संदर्भात खोटी माहिती पसरवत आहेत. उद्या (१ एप्रिल) एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. मात्र, “उद्या एप्रिल १आहे. दर वर्षी आपण एप्रिल फूलचे खूप जोक्स करतो. पण कोरोना वायरस च्या संकटांशी लढताना थट्टेला स्थान नाही. सगळ्यांना अनुरोध की असेच करू नये. अन्यथा पोलिस व सायबर सेल मार्फत कठोर कार्रवाई केली जाईल,” असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणिला खोटे मेसेज पाठवणूक फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यंदा एप्रिल फूलमध्ये कोरोना विषाणू संबंधित चुकीचे मेसेज सेंड केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, एप्रिल फूलच्या निमित्ताने कोणीही कोरोना विषाणूसंदर्भात संभ्रम निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावर टाकू नये, अथवा व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात ग्रुप ॲडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल अशी सेटिंग करावी, असे आवाहनही शिसवे यांनी केले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल -जयंत पाटील

News Desk

माझं मत – आपल्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का ?

News Desk

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं वक्तव्य

News Desk