HW News Marathi
देश / विदेश

महिलांची छेड काढणाऱ्या आरोपींचे भर चौकात फोटो लागणार !, योगी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली । महिलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर आळा घालण्यासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात यापुढे महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक आलेल्या आरोपीचे पोस्टर त्या शहरामध्ये लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे.

योगी सरकारच्या या महिलांची छेड काढणाऱ्या आरोपींचे फोटो चौकात जाहीरपणे लावण्याच्या पोलिस खात्याच्या मोहिमेला ‘मिशन दुराचारी’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत महिला पोलीस अधिकारी शहरांमधील प्रमुख ठिकाणी गस्त घालणार आहेत. त्याचप्रमाणे, महिलांना त्रास देणाऱ्यांवर कडक नजर ठेवणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, या कारवाईसोबतच या आरोपींचे फोटो शहरातील चौकांमध्ये लावण्याचेही आदेश मुख्यमंत्री योगींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट

News Desk

मिशन गगनयानमुळे रोजगार निर्मितीत मोठी वाढ 

swarit

देशातील ‘हे’ पहिले राज्य झाले ‘कोरोनामुक्त’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

News Desk