HW News Marathi
महाराष्ट्र

प्रीतम यांनी मंडे टू संडे अशी हाक दिली त्यावर कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे!

बीड।भगवान गडावर आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा मेळावा झाला नव्हता. पण यावर्षी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात भगवान गडावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. या मेळाव्यात खासदार प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच काही कार्यकर्त्यांनी आवाज येत नसल्याची तक्रार केली. त्यावेळी प्रीतम यांनी मंडे टू संडे अशी हाक दिली. त्यावर कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे असं म्हणाले.

लांबलचक भाषणं करायला मला आवडत नाही

भाषण करु का नको करु? तुम्ही शांत राहिला तर कसं भाषण करणार? लांबलचक भाषणं करायला मला आवडत नाही. आवाज येत नाही? आपला आवाज फक्त बीड जिल्हा किंवा मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला माझा आवाज येत नाहीय? असा विनोद प्रीतम मुंडे यांनी केला.सावरगावच्या गावकऱ्यांचं आभार व्यक्त करते. आज या मेळाव्याला येत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी अतिवृष्टी झाली की काही लोकांच्या मनात शंका होती की मेळावा होईल का नाही? किती मोठी होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या लोकांना सांगायचं आहे, जरा डोळे उघडून बघा. रसाळलेला जनसमुदाय बघा. हा भगवान बाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांचा प्रतिक आहे.

अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही

आज दसऱ्याचा दिवस आहे, विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचे अनेक रुप बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायावी, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलंय. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही. याचंसुद्धा हा विजयादशमीचा सण प्रतिक आहे. त्यामुळे मी आज सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतेय.

सकाळपासून आलेले तुम्ही सर्व मुंडे परिवाराचा भाग आहात

आज इथे आलेला प्रत्येक माणूस मनामध्ये अपेक्षा घेऊन आला आहे. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. कारण मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाही. तर इथे आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला, मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आज मंचावर उपस्थित राहिलेले मान्यवर, सकाळपासून आलेले तुम्ही सर्व मुंडे परिवाराचा भाग आहात. आपला मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही. तर हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. इथे आल्यानंतर ऊर्जा मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अमृताताई आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो”

News Desk

जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला – शरद पवार

News Desk

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी

News Desk