HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीची पोलीस कोठडी मुदत आज संपली होती. यानंतर पोलिसांनी केतकीला आज (१८ मे) सकाळी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी केतकीवर राज्यभरात १५ तब्बल ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस केतकीचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 दरम्यान, केतकीला १५ मे रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली होती. तेव्हा केतकीला न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यावेळी ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे सुनावणीदरम्यान ठाणे पोलिसांनी न्यायालयात केतकीची पोलीस कोठडीची मागणी केली होती. तेव्हा केतकीने न्यायालयात वकील न घेता स्वत: युक्तीवाद केला होता. “मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?,” असे युक्तीवात केतकीने स्वत: न्यायालयात केला होता. 

या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता. कळव्यात केतकीविरोधात पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२), ५०१, आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारींनी केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायालयात हजर होते. परंतु, ठाणे न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाणे न्यायालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. केतकीविरोधात कळवा, पुणे, अकोला, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव गुन्हा दाखल केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे येत्या ७ मार्चला ‘अयोध्या’ला जाणार

News Desk

आपल्यापेक्षा ताकदवान लोकांशी लढा, लहान मुलांशी लढण्यात काय गंमत !

swarit

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवामान खात्याचे केले कौतुक

News Desk