मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी समोर आले आहे. दरम्यान, या वृत्तानंतर राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एक सल्ला दिला आहे. “आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच. पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा”, असा सल्ला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.
काळजी घ्या @mieknathshinde जी!
गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा! https://t.co/1NEeSzsPh3
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 24, 2020
एकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येताच आदित्य ठाकरेंसह अनेक नेते-मंत्रिमंडळींनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत म्हटले आहे कि, “काळजी घ्या एकनाथ शिंदे जी! गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा!”
काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2020
एकनाथ शिंदेंनी स्वत: ट्विट करून आपल्याला झालेल्या कोरोना संसर्गाची झाल्याची माहिती दिली आहे. “गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने काल त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठिक आहे. काळजी करू नका. परंतु, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोव्हिड चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी” ,असे आवाहनही एकनाथ शिंदेनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.