HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचं मोठं प्लॅनिंग, नेमकं काय आहे साहसी पर्यटन धोरण?

मुंबई | राज्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (१४ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग यासारख्या खेळांना नोंदणीनंतर परवानगी मिळणार आहे. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी आणि निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल अशी माहिती त्यांनी दिली.

पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणा नमूद

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आजच्या (१४ जुलै) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले ते असे. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती आणि विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात येतील.

या समित्यांमध्ये जमीन, हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित आणि शिस्तबध्दरित्या आयोजित करण्यासाठीच्या सविस्तर आणि तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील.

लोकल अद्यापही बंदच

महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं ते लोकल सुरु होण्यावर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावलीसह लोकल सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासाचा विचार व्हावा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मात्र, त्याबाबत आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय.

व्यापाऱ्यांना दिलासा नाही

दुसरीकडे राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरात व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यामुळे व्यापारी वर्गाचा संताप पाहता व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याबाबतही या बैठकीत निर्णय झालेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिका झाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी!

News Desk

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस छेडणार आंदोलन

News Desk

मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यामूळे मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

News Desk