मुंबई । युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून (१८ जुलै) सुरुवात होणार आहे. या यात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातून होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केले, त्यांची मने जिंकणे या यात्रे मागचे हे ध्येय आहे.
“ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत.”
.
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्या जळगाव येथून शुभारंभ होणार आहे. #AadityaThackeray #JAYMaharashtra pic.twitter.com/2XbsaUJaGg
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) July 17, 2019
महाराराष्ट्र भर ही जन आशीर्वाद यात्रा काढली जाणार असून या यात्रेचा पहिल्या टप्प्यात १८ ते २२ जुलै या पाच दिवसांच्या काळात जळगाव-नाशिक-धुळे-अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. जन आशीर्वाद यात्रा हा साधारण चार हजार किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार असून समाजातील प्रत्येक घटक, युवाशक्तीशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
अस आहे जन आशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा
- १८ जुलै – जळगाव
- १९ जुलै – धुळे, मालेगाव
- २० जुलै – नाशिक शहर
- २१ जुलै – नाशिक ग्रामीण, नगर
- २२ जुलै – नगर, श्रीरामपूर, शिर्डी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.