मुंबई | सर्वोच्च न्यायालायने गुरुवारी (१७ जानेवारी) महाराष्ट्रातील डान्सबारवर बंदी उठवली असून डान्साबारवर लावण्यात आलेल्या सर्व अटी रद्द करण्यात आल्या आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, गरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. डान्सबार मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
Maharashtra Finance Minister Sudhir Mungantiwar on SC verdict on Dance bars: After analysis of the SC order and discussions on it with the law & justice dept, if needed, we will issue an ordinance to stop dance bars in Mumbai. (File pic) pic.twitter.com/UneTPfWVlZ
— ANI (@ANI) January 18, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घेऊ आणि डान्सबारबाबत कठोर नियम करण्यात येतील, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जरी बार सुरु करा सांगितले असले तरी पोलिसांना सूचना देऊन स्थानिक पातळीवर कायदे कठोर आणि नियम कडक केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालायने रद्द केलेले डान्स बारचे नियम
- डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सर्वोच्च न्यायालायने रद्द केला
- बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अट देखील शिथिल
- बारबालांना टीप देण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी ते पैसे बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत
- बारबालांना डान्स बारमध्ये अश्लील नृत्य करण्यास मनाई
- बारबालांना टीप न देण्याची राज्य सरकारची अट रद्द
- डान्स बारमध्ये दारु पिण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी उठवली
- महाराष्ट्रात संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत डान्स बार सुरु राहणार
- डान्स बार हे धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर ठेवण्याची अटही मागे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.