HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात महिलेच्या मृत्यूनंतर आलेला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

पुणे | पुण्यात कोरोनाचा फैलाव हा मुंबईनंतर आघाडीवर आहे. आज (११ एप्रिल) पुण्यातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्या पुण्यात आता २९ वर पोहोचली आहे. मृत वृद्धेचे वय ६३ वर्ष होते आणि त्यांच्यावर आधी पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला जो पॉझिटिव्ह होता.

तसेच, महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच, लॉकडाऊनच्या नियमांचे जर पालन केले नाही तर हा लॉकडाऊन पुढे जाण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. त्यामूळे घरात राहा, बाहेर पडू नका आणि लवकरात लवकर कोरोना कसा निघून जाईल यासाठी सगळेजम प्रयत्न करुयात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा, उपमुख्यमंत्र्यांचे विराेधकांना खुले आव्हान

News Desk

मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो !

News Desk

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …! – चंद्रकांत पाटील

Aprna