नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (१४ सप्टेंबर) अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान, भाजप प्रवेशानंतर आता लगेचच उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी देखील सज्ज झाले आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. रविवारी (१५ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सातारा जिल्ह्यात येणार असून यावेळी लोकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधानांची अनुपस्थिती
उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपस्थित राहिले नाहीत. अनेक दिवस चाललेल्या उलटसुलट चर्चांनंतर उदयनराजे भोसले यांनी अखेर शनिवारी (14 सप्टेंबर) नवी दिल्लीत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः ट्विटरवर पोस्टद्वारे दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला भाजप प्रवेश होईल असेल उदयनराजेंनी म्हटले होते. मात्र, उदयनराजेंच्या भाजपप्रवेशला पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी उपस्थित नव्हते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.