HW News Marathi
महाराष्ट्र

आज पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार उदयनराजेंचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली । राष्ट्रवादीचे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे आज (१४ सप्टेंबर) अखेर भाजपमध्ये प्रवेश करतील. पक्षश्रेष्ठींच्या विशेष उपस्थितीत नवी दिल्लीत उद्यनराजेंचा भाजप प्रवेश होईल. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील.

गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पक्षांतराच्या निर्णयाबाबत उदयनराजे स्वतः बरेच संभ्रमात असल्याचे देखील वृत्त होते. राष्ट्रवादीकडून बऱ्याचदा उदयनराजे यांची भेट घेऊन, चर्चा करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र, त्यानंतरही उदयनराजे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री उशिरा उदयनराजेंनी आपल्या खासदरकीचा राजीनामा दिला.

गुरुवारी (१२ सप्टेंबर) शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर परतलेल्या उदयनराजेंनी तब्बल ५ तासांनी भाजपच्या संपर्कयंत्रणेला होकार दिला. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांसह दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. विधानसभेच्या तोंडावर उदयनराजेंचा प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत मोठा धक्का असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna

#MaharashtraResult2019 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भोकरमधून विजयी

News Desk

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक

News Desk