HW News Marathi
Covid-19

सातारा, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्हा होणार लाॅकडाऊन !

सांगली | सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ ते ३० जुलै सांगलीमध्ये लॉकडाऊन असणार आहे.जिल्ह्यात मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय ३० जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगलीत २२ जुलैपासून रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलैला रात्री १० वाजेपर्यंत लॉकडाऊन असणारच आहे. सांगलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामूळे सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी या निर्णय घेतला आहे. या आधी जयंत पाटील यांनी गर्दी कमी न झाल्यास आणि आकडा कमी न झाल्यास लॉकडाऊन पुन्हा करण्याचा इशारा दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा अजित पवारांचा दांभिकपणा…दखल घ्या, कुचेष्टा करू नका ! चंद्रकांत पाटील संतापले

News Desk

काँग्रेस नेते राजीव सातव ICU मध्ये, प्रकृती स्थिर; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

News Desk

#SushantSinghRajput Case | बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली CBI चौकशीची शिफारस

News Desk