HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंचे ‘हे’ ट्वीट चर्चेत

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमांतून व्यक्त केल्या आहेत. मलिकांना अटक झाल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत मलिकांवर निशाणा साधला आहे. “पैहचान कौन ?”, यासोबत फोटो देखील ट्वीट केला आहे. राणेंनी ट्वीट केलेल्या फोटोत एक डुकर जाळ्यात अडकले असून त्याला दोन व्यक्तींनी पकडेल्याचे दिसून येत आहे. नितेश राणेंच्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चा विषय बनले आहे. यापूर्वी देखील दोन्ही नेत्यांमध्ये ट्वीटरवॉर रंगले होते.

यापूर्वी देखील नितेश राणेंनी आणि मलिकांमुध्ये ट्वीटवर वॉर सुरू होते. तेव्हा हिवाळी अधिवेशनात राणेंनी सरकारविरोधात आंदोलन सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर आंदोलन करत देत होते. त्यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधिमंडळात दाखल होत होते. तेव्हा राणेंनी ‘म्याव-म्याव’ असा मांजराचा आवाज काढून आदित्य ठाकरेंना चिडविले. यानंतर राणे खूप खूश होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी विधिमंडळातच्या पायऱ्या चढताना राणेंकडे दुर्लक्ष करत सभागृहात दाखल झाले.

यानंतर मलिकांनी २५ डिसेंबर रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवर एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केलेला फोटो ट्वीट केला. यानंतर नितेश राणेंनी देखील डुकराचा फोटो मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. या दोन्ही नेत्यांनी फोटो मॉर्फ करून एमेकांवर टीका केली आहे. यावरून राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळ होत आहे. मलिकांनी ट्वीटमध्ये म्हटले, “पैहचान कौन ?,” असे ट्वीट केले आहे. मलिकांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ केला आहे. मलिकांच्या ट्वीटला राणेंनी देखील जशास तसे उत्तर दिले. राणेंनी ट्वीटमध्ये,” मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आहे. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..ओळखा पाहू कोण?,” असे फोटोला कॅप्शन राणेंनी दिली आहे. राजकीय नेत्यांच्या या ट्वीटरवॉरवरून राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलीस आयुक्त पदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

swarit

मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले ! | बाळासाहेब थोरात

News Desk

राज्यपालांच्या इंग्रजी पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत दिलेले उत्तर ऐतिहासिक दस्ताऐवज आहे – संजय राऊत

News Desk