मुंबई | मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार रात्री धर्मा पाटील यांनी जेजे रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकावर विरोधांकानी कडाडून टीका करण्यास सुरूवात केली आहे. सरकारला लाज वाटते का अशी टीका सुप्रिया सुळे यांनी टिव्टरवर वरती केली आहे.
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !
या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.— Supriya Sule (@supriya_sule) January 28, 2018
तर धनंजय मुंडे यांनी 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वस घेतला. यामुळे शेत-यांमध्ये सतापले असून सरकाच्या या हलगर्जीपणामुळे विरोधकांनीही सरकारवर कडाडून टीका करत कारावाईची मागणी करत आहे.
धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा. @Dev_Fadnavis pic.twitter.com/b1RP0OFx60
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 29, 2018
धुळेतील शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळवा यासाठी एकवटले आहेत. शेतक-यांनी रास्ता रोको आणि निषेध केले. तर मुंबईत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी जे जे रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
Deeply pained by the death of 84 year old farmer, Dharma Patil who fought against insensitive & apathetic Govt. Messed up loan waiver, non-remunerative farm prices & cruel land acquisition with unfair compensation has ended another precious life. Order judicial enquiry.
— Prithviraj Chavan (@prithvrj) January 29, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.