HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही”- मुख्यमंत्री

मुंबई। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी आज (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही,” असे ट्वीट करत बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने राज्यात शोककळा पसरली आहे. बाबासाहेब यांच्या निधनानंतर अनेक नेते मंडळींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. यात बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने राज्यात शोककळा पसरली आहे. बाबासाहेब यांच्या निधनानंतर अनेक नेते मंडळींनी ट्वीट करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केलं, “शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.” शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट म्हणालं, “अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत म्हटलं, “इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री एकनाथ खडसे दोषी! कायदेतज्ञ असीम सरोदेंचा दावा!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी परब थेट पवारांच्या भेटीला

News Desk

शिवसेना-भाजप युतीत दुरावा निर्माण करण्यामागे षडयंत्र चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप!

News Desk