HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड – कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

– सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी सोहळा

मुंबई – राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानुसार कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास आज पासून सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर कर्जमाफी सोहळ्याचे आयोजन सह्याद्री अतिथी गृहात करण्यात आले होते. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणीव यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली. तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल जवळपास ८ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ‘आपले सरकार’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दिवाळीचा मुहूर्त साधून ही कर्जमाफी करण्यात आली. या पुढे दररोज 2 ते 5 लाख खात्यांध्ये ही रक्कम भरली जाणार आहे. जवळपास ७७ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आजचा दिवस कर्तव्य पूर्तीचा दिवस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सत्तेत आल्यानंतर शेतीत मोठी गुंतवणूक केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २१ हजार कोटी वरून ६५ हजार कोटींवर शेतीतील गुंतवणूक नेल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवारचाही शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे ते म्हणाले. आधीच्या सरकारने कर्जमाफी केली होती. त्यात बँकांचे भले झाले. त्यांनीच तो पैसा लाटला. त्यामुळेच ऑनलाईनवर भर देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नोव्हेंबर पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळेल असेही त्यांनी सांगितले. हा निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण यांच्या बरोबर चर्चा केली होती. त्यांचेही आभार मानत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“….तर सामना पेपर जेलमधून काढायचा का?” सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेला सवाल!

News Desk

स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवलेल्या कॉंग्रेसला राऊतांनी दिली समज!

News Desk

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली 

News Desk