HW News Marathi
महाराष्ट्र

नवनीत राणांचा MRI करतानाचा फोटो व्हायरल झाल्यावरून शिवसेनेने लीलावती रुग्णालयाच्या प्रश्नाला विचारले ‘हे’ प्रश्न

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. नवनीत राणांना काल (८ मे) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. परंतु, रुग्णालयात उपचार घेत असताना एमआरआय स्कॅन करण्यासाठी गेले असताना त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून शिवसेनेचे नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी आज (९ मे)  महापौर किशोरी पेडणेकर, भाजपच्या नेत्या मनिषा कायंदे आणि शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला प्रश्न विचारुन त्यांना धारेवर धरले. 

यावेळी नवनीत राणांनी गुरुवारी (५ मे) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा रुग्णालयात एमआरआयवर करत असताना फोटो आणि व्हिडिओ काढण्यात होता. त्यावर शिवसेनेने प्रश्न विचारला की, रुग्णालयात सर्व सामान्यांसाठी आणि सेलिब्रिटीसाठी वेगळा न्याय आहे का?, रुग्णालयात फोटो आणि व्हिडिओ शुटींग कसे काढण्यात आले?, नवनीत राणांचा खरच एमआयआर झाला की नाही?, आणि एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा गेला कसा? एमआरआय करताना एकाच व्यक्तींची परवानगी असताना नवनीत राणांसोबत चार जण आत कसे होते? आदी प्रश्ना शिवसेनेच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या प्रश्नाला केले आहेत. 

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस जारी 

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे आता राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीला गेले आहे. राणा दाम्पत्य दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, आणि गृहसचिव यांची भेट घेऊन ठाकरे सरकारने त्यांच्यावर केलेल्या अत्याचारची तक्रार करणार आहे. “लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना भेटून पूर्ण घटनेची माहिती देणार आहे. आमच्यावर कसा अत्याचार झाला आणि केंद्रीय तपास यंत्राच्या माध्यमांतून या पूर्ण घटनेमध्ये चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्या पद्धतीने आमच्यावर अत्याचार झाला, त्यावर केंद्रीय तपास यंत्रणेनी कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी करणार असल्याची माहिती नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

News Desk

“नाना पटोले असे व्यक्ती आहेत, की ते…”, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका!

News Desk

मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याला अखेर पोलिसांनी सोडले

News Desk