मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांची आज (१४ मे) निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे. राज्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आपापल्या संख्याबळानुसारच उमेदवार दिल्याने राज्याची विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
शिवसेनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसकडून राजेश राठोड एक उमेदवार, असे महाविकासआघाडीकडून पाच जणांनीच निवड झाली आहे. तसेच भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांची निवड झाली आहे. विधानपरिषदेच्या बनविरोध निवडनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी ९ आमदारांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आमदार म्हणून विधान परिषदेवर मा.@CMOMaharashtra उद्धवजी ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. महाराष्ट्र सरकार रयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार याचा मला विश्वास आहे pic.twitter.com/DWaWDQYd2V
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 14, 2020
“आमदार म्हणून विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. महाराष्ट्र सरकार रयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार याचा मला विश्वास आहे,” असे ट्वीट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
मा. @shindespeaks, मा. @amolmitkari22 यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन! आपण सामान्यांच्या समस्या सभागृहात मांडाल याची मला खात्री आहे.@NCPspeaks pic.twitter.com/GnDFOeQV3i
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 14, 2020
तसेच “राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन! आपण सामान्यांच्या समस्या सभागृहात मांडाल याची मला खात्री आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT जी, @neelamgorhe जी, @shindespeaks जी, @amolmitkari22 जी व राजेश राठोड जी यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन!
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 14, 2020
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड जी यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन!,” असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीव केले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व @ShivSena नेत्या नीलम गोऱ्हे (@neelamgorhe) यांची बिनविरोध निवड झाली.याबद्दल त्यांचे अभिनंदन.आपणास भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. @OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) May 14, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले, “विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नेत्या नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.याबद्दल त्यांचे अभिनंदन.आपणास भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा.”
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व @ShivSena नेत्या नीलम गोऱ्हे (@neelamgorhe) यांची बिनविरोध निवड झाली.याबद्दल त्यांचे अभिनंदन.आपणास भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. @OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) May 14, 2020
“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व नेते शशिकांतजी शिंदे आणि अमोल मिटकरी यांची बिनविरोध निवड झाली.याबद्दल त्यांचे अभिनंदन.आपणास भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा,” असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व @NCPspeaks चे नेते शशिकांतजी शिंदे (@shindespeaks) आणि अमोल मिटकरी (@amolmitkari22) यांची बिनविरोध निवड झाली.याबद्दल त्यांचे अभिनंदन.आपणास भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा.
— Supriya Sule (@supriya_sule) May 14, 2020
“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसचे राजेश राठोड यांची बिनविरोध निवड झाली.याबद्दल त्यांचे अभिनंदन.आपणास भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा,” राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.