HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन केली आहे. अन्यथा २५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा ठोक मोर्चा काढण्याचा इशारा समन्वयकांनी दिला आहे. तसेच हे आंदोलन १ डिसेंबरपासून तीव्र केले जाईल, असे देखील म्हटले आहे.

सरकारने मराठा समाजाला जी आश्वासने दिली आहेत. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी कोणतीही अधिकृत अशी भूमिका जाहीर केलेली नाही. सरकारने दिलेले आश्वासनांत आरक्षण वैधानिक कार्यवाही १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मान्य केले होते. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवू, असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मात्र सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसत असल्याचा आरोप लोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला आहे.

परळीमधील आंदोलनाप्रमाणे संपूर्ण राज्यात या आंदोलनांची पुरावृत्ती करण्यात येणार आहे. यामध्ये मराठा आमदार किंवा खासदार आरक्षण प्रश्नी गंभीर दिसत नसून मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. परंतु सरकार सकारात्मक दिसत नसल्याने २५ नोव्हेंबरपासून विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व आमदार व खासदारांच्या घराबाहेर आंदोलनाने करून मुख्य आंदोलनास सुरूवात करणार असल्याची प्रतिक्रिया रमेश केरे पाटील यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या रायगड दौऱ्यावर जाणार

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जाणार

News Desk

‘सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा ‘ नाना पटोलेंची उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका

News Desk