मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्या बच्चन अखेर कोरोनमुक्त झाले आहेत. त्या दोघांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेता आणि पती अभिषेक बच्चन यांनी आज (२७ जुलै) ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची मााहिती दिली होती. “तुम्ही सातत्याने केलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप मनापासून आभार. यासाठी मी कायमच तुमचा ऋणी राहीन. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच आहोत”, असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहे.
Thank you all for your continued prayers and good wishes. Indebted forever. 🙏🏽
Aishwarya and Aaradhya have thankfully tested negative and have been discharged from the hospital. They will now be at home. My father and I remain in hospital under the care of the medical staff.— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) July 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.