HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर!

पुणे | रात्रीतून अचानक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या (२८ ऑगस्ट) पुण्यात एकाच मंचार येणार आहेत.निमित्त आहे बाणेर येथील कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याचे. महत्वाची बाब म्हणजे सध्या आघाडी आणि विरोधी पक्षात जो काही घोळ सुरू आहे त्यानंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे चर्चा तर नक्कीच होणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात पुणेकरांना जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांतून सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी ११ वाजता अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

जम्बो सेंटरनंतर सर्व सुविधायुक्त दुसरे मोठे कोविड सेंटर पुणे शहरात उभे राहिले आहे. सदर सेंटर पुणे महापालिकेच्या माध्यमातून पंचशील फाउंडेशन, एबीआयएल फाउंडेशन, माईडस्पेस बिझनेस पार्क प्रा. लि., मालपाणी ग्रुप संगमनेर, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांच्या सहकार्यातून साकारले आहे. सेंटरचे शुक्रवारी लोकार्पण होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार गिरीश बापट आणि खासदार-आमदार यांची उपस्थिती राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे अटक प्रकरणात शरद पवार आणि अनिल देशमुख काय म्हणाले ?

News Desk

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग, अथक परिश्रमाने आग आटोक्यात, ८०० दुकानं जळून खाक

News Desk

साईदर्शनधील 17 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट

News Desk