HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार पहाटे ६ वाजता ॲान फिल्ड! पुणे मेट्रो कामाचा घेतला आढावा ….

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (१८ सप्टेंबर) सकाळी लवकर पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी संत तुकाराम नगर ते एचए कंपनी असा मेट्रो प्रवास केला. अजित पवारांचा दिवस सकाळी अगदी लवकर सुरू होतो. त्यामुळे, त्यांचे अनेक कार्यक्रम सकाळी लवकर होतात. त्यातही अजित पवार नियोजित वेळेआधीच पोहोचतात आणि त्यामळे अनेकदा आयोजकांची चांगलीच तारांबळ उडते.

अजित पवार आज पहाटे चक्क ६ च्या सुमारास फुगेवाडीला दाखल झाले होते. पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांची व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनकडे रवाना झाले. यावेळी अजित पवारांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. त्यानंतर संत तुकाराम नगरला मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन त्यांनी मेट्रो प्रवास केला.

मेट्रो स्टेशनवरील तिकीटविक्रीबाबत देखील अजित पवारांनी यावेळी माहिती घेतली. मेट्रोचालकाच्या केबिनमधून देखील त्यांनी आढावा घेतला. यावेळी काही पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे, आज दुपारी अजित पवारांनी पुण्यातील कोरोनस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार! – अजित पवार

Manasi Devkar

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण…”, रोहित पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा इशारा

News Desk

माझे नेते मोदी आणि शहा ! पंकजा मुंडेंचा रोख फडणवीसांवर ?

News Desk