HW News Marathi
महाराष्ट्र

एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही – अजित पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय कृषी कायद्याबबात आज महत्वाचे वक्तव्य केले आहे. कृषी कायद्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आहे. “आज कृषी कायद्याबाबत प्राथमिक चर्चा होत आहे. एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. माझी वैयक्तिक भूमिका महाविकास आघाडीची नाही”, असं अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

“कृषी कायद्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही केंद्राला सांगितलं चर्चा करा. ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा. काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. बिल रद्द करा असं शेतकरी संघटनांचं मत आहे. महाविकास आघाडी सरकारने या बिलाविरोधातील आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे. आज प्राथमिक चर्चा होणार आहे. आज काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा. सगळ्यांशी चर्च करु. मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही” असं अजित पवारांनी नमूद केलं.

दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे. ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी नमूद केलं आहे. तर साखर प्रश्नाबाबत अजित पवार म्हणाले, “310 लाख टन साखर तयार होईल असा अंदाज आहे. तेवढी साखर परदेशात निर्यात केली. अनुदान जाहीर केलं. जो साखरेचा दर 31 रुपये ठरवला तो वाढवावा , यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 31 रुपये दर वाढवावा”, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prithviraj Chavan Exclusive : फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा पायाभूत प्रकल्प पूर्ण झाला नाही !

News Desk

“आंदोलनजीवी म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचा अखेर विजय” – नाना पटोले

News Desk

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा,” अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर 

News Desk