पुणे | उपमुख्यमनातरी अजित पवारांच्या हस्ते आज(३० जुलै) पुण्याच्या मेट्रोला हिरवा कंदील मिळाला आहे. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
#पुणेमेट्रो च्या #रिच१ पीसीएमसी ते रेंज हिल या मार्गावरील काही मेट्रो स्थानकाच्या कामाच्या प्रगतीचे छायाचित्रे.
Glimpse of work progress of some #MetroStations of #PuneMetro #Reach1 PCMC to Range Hill.#LavkarachApliMetro #WeWillMakeIt pic.twitter.com/99qiicPeHE
— Pune Metro Rail (@metrorailpune) July 27, 2021
कार्यक्रम लवकर घेण्याचं कारण काय?
अजित पवारांनी सकाळी हा कार्यक्रम केला. त्यावर कोरोना जास्त पसरू नये म्हणून त्यांनी हा कार्यक्रम सकाळी घेतल्याचं सांगितलं आहे. “सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला? तर सकाळी सुरुवात चांगली होते. कोरोनाचं संकट आहे, आम्हीच नियम करायचे, अन् मोडायचे कसे? गर्दी नको म्हणून मी सकाळी 6 ला घ्या म्हटलं होतं, पण दीक्षित म्हणाले 7 ला घेऊ. इतर पुणेकरांना त्रास व्हायला नको, गर्दी व्हायला नको. म्हणून कार्यक्रम लवकर घेतला. आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, इथं दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.