HW News Marathi
Covid-19

“…नाहीतर आमच्यावर बील फाडाल”, अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

मुंबई । राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा सातत्याने वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर, शासन आणि प्रशासन सतर्क झाले आहेत. वारंवार शासन-प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. याचबाबत, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, “राज्यावरचे कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमरावती, अकोला, पुणे, अशा विविध भागात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत. सर्वांना कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सर्वांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे हे नियम पाळलेच पाहिजेत. मात्र, काही नेते म्हणतात ‘मी मास्क वापरत नाही.’ पण, दुसऱ्यांना त्रास झाला तर काय ? एकेकाळी प्रविण दरेकरांचे ते नेते होते”, असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. आपल्या माहितीसाठी, दरेकर आधी ‘मनसे’त होते

सभागृहात बोलताना प्रवीण दरेकरांना टोला लगवताना अजित पवार म्हणाले की, “राज्याच्या मंत्रिमंडळातील ७ ते ८ सदस्य कोरोनाबाधित आहेत. काही आमदारांनाही कोरोना झाला आहे. फक्त मुख्यमंत्री, प्रविण दरेकर आणि सभापतींना देखील कोरोना झाला नाही. मात्र, दरेकर तुमची रोग प्रतिकारकशक्ती जास्त असेल किंवा तुमचं जॅकेट पाहून कुठं आत शिरायचं म्हणून तुम्हाला कोरोना झाला नसावा. तुम्हाला कोरोना होऊच नयेच. नाहीतर, उद्या समजा कोरोना झाला तर कशाला दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल”, असा टोला अजित पवारांना लगावला आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांना कामधंदा नाहीय, जुनी गोष्ट उकरून काढतायत ! अजित पवारांची टीका

News Desk

लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तो मान्यच, पण….! । अमृता फडणवीस

News Desk

मुंबई लोकलची संख्या वाढवली, तब्बल ३५० लोकल रुळावर

News Desk