HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची नियुक्ती

मुंबई | आजपासून (२४ फेब्रुवारी) विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या कामकाजात विरोधी पक्ष नेत्यांनी बराच गदारोळ घातला. दरम्यान, सभागृहाचे कामकाज आज सुरु होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह पदी नियुक्ती केली. या पदी आधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे होते.

विधानपरिषदेत सरकारची बाजू स्पष्टपणे मांडणाऱ्या नेत्याची आवश्यकता असल्याकारणाने अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. कारण, सुभाष देसाई हे शांत असून त्या उलट अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि आक्रमक असून सरकारची बाजू ते ठामपणे मांडू शकतात. २०२० वर्षात विधानपरिषदेतील अनेक आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. जून महिन्यात राज्यपालांनी नियुक्त केलेल्या १२ आमदारांची निवड महाविकास आघाडीच्या सरकारमधून करण्यात येणार आहे.

अजित पवार आपल्या कामाबाबतीत आग्रही असतात. नियमानुसार काम करणे, नवीव सदस्यांना बोलण्याची संधी देणे याबद्दलची त्यांची भूमिका आग्रही असते. या आधी नागपूरातील अधिवेशनात अजित पवारांनी सभागृहात नियमांचे दाखले देत कामकाज सुरळीत चालविण्याचा अट्टहास केला होता. अजित पवारांच्या कामाच्या बाबतीतील ही शिस्त पाहता सभागृहाच्या कामकाजात सुसूत्रता येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडतेय, विशेष अधिवेशन बोलवा’ – भगतसिंग कोश्यारी

News Desk

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ! पडळकरांची मागणी

News Desk

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

Jui Jadhav