HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल आहे का अशी चर्चा सुरू आहे.पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार ,पार्थ पवार आणि इतर पवार कुटुंबीयही सध्या माध्यमांपासून दूर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमिवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.एकीकडे पार्थ पवार यांच्यामुळे पवार कुटुंबात सध्या आलबेल नाही अशी चर्चा आहे मात्र अजित पवार आणि रोहित पवार यांची आज केवळ कामासाठीच भेट झाली असं सांगितलं जातयं.

रोहित पवार यांनी ट्विट करत या भेटीबद्दल माहिती दिली आहे,त्यांनी लिहीलयं , “मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत अजित दादांना भेटलो.हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल,अशी अपेक्षा आहे,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार !

News Desk

शरद पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटर युद्ध

Aprna

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

News Desk