HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार २ दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर, प्रमुख नेत्यांचाही होणार पक्ष प्रवेश

पंढरपूर | पंढरपुर पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज आणि उद्या अशा दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपा नेते व सहकार शिरोमणी साखर करखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. शिवाय मतदारसंघात काही ठिकाणी सभाही घेणार आहेत. या दौऱ्यात आणखी काही प्रवेश व मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याने अजित पवारांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.या दौऱ्यात कल्याणराव काळे यांच्यासह काही प्रमुख नेते पक्षात प्रवेश करीत आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होत आसलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार शिंगेला पोहचला आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपाचे प्रमुख नेते मतदारसंघात ठाण मांडून प्रचार करीत आहेत. तर राष्ट्रवादीकडून ही या पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पक्ष निरिक्षक सुरेश घुले, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील आदी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. आता त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर ला दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. शिवाय काही नाराजांना ही अजित पवार कामाला लावतील. पंढरपूर, मंगळवेढा शहरांसह काही प्रमुख मोठ्या गावात प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.

Related posts

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यात २७ जानेवारीपासून सुरू होणार प्रत्यक्ष शाळा

News Desk

करी कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अट रद्द करा!

News Desk

कोल्हापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही – सतेज पाटील

News Desk