HW News Marathi
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच! –  अजित पवार

पुणे | पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना १२ मे ला दुपारीच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली होती. आरोपीने पिस्तूलातून ४ गोळ्या झाडल्या होत्या. यात कोणालाही दुखापत झाली नव्हती. यावर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने एका मुलाचे अपहरण केले अशी तक्रार आहे. यावर अजित पवार म्हणाले की, गुन्हा दोन्ही बाजूने दाखल केला आहे. याविषयी कालच पुण्यामध्ये मी स्वतः पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा केली असून यात जो कोणी दोषी असेल तर दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने आज दुपारी पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले होते.

पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नाही आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून शस्त्र जप्त करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’मुळे उद्धव ठाकरे धर्मवीर सिनेमाचा शेवटचा प्रसंग न पाहाता सिनेमागृहातून निघून गेले

Aprna

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk

कोणताही नवा प्रस्ताव नाही, निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर सहमती झाली होती !

News Desk