HW News Marathi
Covid-19

गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावंस वाटलं, पण…! अजित पवारांची नाराजी

पुणे । पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काल (१९ जून) झालेला हा कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात इतकी गर्दी होती की कोरोच्या सर्व नियमांचा फज्जा उडाला. सोशल मीडियावर याबाबतचे फोटोजही चांगलेच व्हायरल झाले आणि विरोधकांनी ह्यावरून अजित पवारांवर सडकून टीका केली. दरम्यान, स्वतः अजित पवारांनीही कार्यक्रमात बोलताना या संपूर्ण प्रकाराबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. “गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला होता. पण सगळेच नाराज झाले असते”, असे अजित पवार म्हणाले.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घटनादरम्यान झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले कि, “गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असे अजित पवार म्हणाले

राज्य सरकारकडून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून स्वत: कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. पण मग त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदळी कसे तुडवले जाऊ शकतात? असा सवाल आता राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या

News Desk

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk

अमरावती जिल्हयात ७ दिवसांचा लॅाकडाऊन ,महाराष्ट्रात काय होणार ?

News Desk