HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार म्हणतात…!

सातारा | राज्यातील अजित पवारांसोबतच्या ८० तासांच्या सरकारबाबत, पहाटेच्या शपथविधीबाबत  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’साठी लेखक, मुलाखतकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीबाबत मोठा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (२७ जून) साताऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी या मुद्द्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. “या मुद्द्यावर मला काहीही बोलायचे नाही. तो माझा अधिकार नाही”, असे म्हणत अजित पवारांनी या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
राज्यात सत्तास्थापनेसाठी एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठक सुरु असताना दुसरीकडे अजित पवारांच्या एका पहाटे अचानक देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर, अगदी आजपर्यंत अजित पवारांनी कधीही त्या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या नुकत्याच केलेल्या दाव्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा ठळकपणे पुढे आला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य करणे पूर्णपणे टाळले आहे.
देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ गौप्यस्फोट

“अजित पवारांसोबत ८० तासांच्या सरकारबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, मी योग्यवेळी याबाबतचा खुलासा करेन यावर मी स्वतःच पुस्तक लिहीन. त्यावेळी आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. लक्षात घ्या ‘राष्ट्रवादी’ म्हणजे ‘अजित पवार’ नाही. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. त्यानंतर आम्ही शांत होती. ३-४ दिवस आम्ही काहीही हालचाल केली नाही. त्यानंतर मात्र, आम्हाला थेट अजित पवारांकडून फिगर आली. ते म्हणाले हे तीन पक्षांचे सरकार काही टिकू शकत नाही. म्हणूनच तो पहाटेचा शपथविधी झाला”, असाही गौप्य्स्फोट यावेळी फडणवीसांनी केला.

Related posts

पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणे गरजेचे, दया… कुछ तो गडबड है !

News Desk

नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ आगामी लोकसभा निवडणूक लढविणार

News Desk

शिवसेना काँग्रेससोबत गेली तर ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची प्रतारणा होईल !

News Desk