HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांचा बांध फूटला, शरद पवारांची बदनामी झाली म्हणून राजीनामा !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल केलाही त्यांची बदनामी झाल्यामुळे मी राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले. महाराष्ट्र सहकारी बँके घोटाळ्यात शरद पवारांवर झालेली कारवाई ही कारवाई बिनबुडाची असल्याचे सांगत सरकारवर टीका केली. पवार पुढे म्हणाले की, बँकेची ठेवी ११,५०० कोटीच्या, मग २५ कोटीचा घोटाळा कसा, असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला.

शिखर बँक घोटाळा २०१०मध्ये घडला असताना,या प्रकरणी गुन्हा २०१९मध्ये कसा दाखल केला, असा उलट सवाल करून राज्य सकरावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांना पवारांना अश्रू अनावर झाले असून आम्ही मानसे आहोत, आम्हालाही भावना आहेत, असे म्हणाले. अजित पवारांनी काल (२७ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्ये, नेते मंडळींची भावना दुखाविल्याबद्दल माफी मागतो. विवेकबुद्धीला स्मरुन मी राजीनामा दिल्या पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२७ सप्टेंबर) त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अजित पवार यांचा नॉट निचेबल येत होता. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर आज (२८ सप्टेंबर) दुपारी १२.४५ वाजता अजित पवार जाईन भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार, अजित पवार आणि इतर कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा झाली. ही पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार आहे.

या भेटीनंतर अजित पवार निवासस्थानमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी पत्रकार परिषदेत सांगेन असे म्हणाले. यानंतर शरद पवारांनी चिंतेचे काहीही कारण नाही. अजित पवार त्यांच्या स्वत: सर्व काही सांगेन असे शरद पवार म्हणाले. अजित पवार या पत्रकार परिषदेत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • शरद पवारांच्या सूचनेनंतर पत्रकार परिषद
  • शरद पवारांच्या नजरेला नजर भिडवू शकलो नाही
  • आम्ही मानसे आहोत, आम्हालाही भावना आहेत
  • अजित पवारांना अश्रू अनावर
  • पवार कुटुंबात गृहकलह अजितबात नाही – अजित पवार
  • शरद पवारांचा शब्दत कुटुंबात अंतिम – अजित पवार
  • बारामतीच्या पुरामुळे काल (२७ सप्टेंबर) मुंबईतील गैरहजर असल्याचे अजित पवारांनी सांगितले
  • शरद पवारांची बदनामी नको म्हणून राजीनामा दिला
  • ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्यामुळे राजीनामा दिल्याचे अजित पवारांनी सांगितले
  • २०१०च्या प्रकरणात २०१९मध्ये गुन्हा कास?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करत सरकारवर टीका
  • पवारांवरच्या गुन्हांने मी व्यथित झालो म्हणून राजीनामा
  • शिखर बँक घोटळ्यात शरद पवारांचा काही संबंध नाही
  • वेळप्रसंगी नियमाबाह्य मदत करावी लागते
  • ‘ठेवीच्या रक्कमेपेक्षा मोठा रकमेचा घोटाळा कसा? ‘, शिखर बँक प्रकरणी अजित पवारांनी सवाल उपस्थित केला
  • विवेकबुद्धीला स्मरुन मी राजीनामा दिला
  • शिखर बँक प्रकरणी कारवाई बिनबुडाची असल्याचे अजित पवार म्हणाले
  • शिखर बँकेची ठेवी ११,५०० कोटीच्या, मग २५ कोटीचा घोटाळा कसा, असा सवाल उपस्थित केला
  • विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दोन दिवसापूर्वी फोन करून तुम्ही कुठे आहे असे विचारले होते
  • माझ्या राजीनाम्यामुळे नेते व्यस्थित झाले
  • राजीनामा देणे ही चूक होती की, नाही हे मला माहिती नाही
  • ज्यांच्या भावना दुखाविल्या त्यांची मी माफी मागतो
  • काल अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांची माफी मागतो.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पत्रकार परिषदेसाठी अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थिती आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डबेवाल्यांना लोकल प्रवास करताना QR कोड घेणे बंधनकारक

News Desk

सागरी सुरक्षा दलाच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

Aprna

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून रूपै एटीएम कार्डचे 8 मे पासून वितरण

News Desk